पशुसंवर्धन विभाग योजना

पशुसंवर्धन विभाग

विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना

१) राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण योजना

सदर योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत असुन सदर योजना सर्व प्रवर्गासाठी राबविल्या जाते. या योजनेमध्ये दोन दुधाळ गाई / म्हशी चा गट पुरविल्या जातो. शेळी गट (१० शेळ्या १ बोकड) पुरविल्या जातो, यामध्ये १००० मासल कुक्कुट पक्षी शेड बांधकामासाठी अनुदान देण्यात येते. सदर योजनेमध्ये खुल्या प्रवर्गासाठी ५० टक्के तसेच अनुसुचित जाती जमाती करीता ७५ टक्के शासकीय अनुदान देण्यात येते.

२) जिल्हा स्तरीय विशेष घटक योजना

सदर योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत असुन अनुसुचित जाती प्रवर्गासाठी राबविल्या जाते. या योजनेमध्ये दोन दुधाळ गाई/म्हशी चा गट पुरविल्या जातो. शेळी गट (१० शेळ्या १ बोकड) पुरविल्या जातो. सदर योजनेमध्ये ७५ टक्के शासकीय अनुदान देण्यात येते.

३) ओ.टी.एस.पी. योजना

सदर योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत असुन अनुसुचित जमाती प्रवर्गासाठी राबविल्या जाते. या योजनेमध्ये दोन दुधाळ गाई/म्हशी चा गट पुरविल्या जातो. शेळी गट (१० शेळ्या १ बोकड) पुरविल्या जातो. सदर योजनेमध्ये ७५ टक्के शासकीय अनुदान देण्यात येते.

४) जिल्हा वार्षिक योजना

सदर योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत असुन सर्व प्रवर्गासाठी राबविल्या जात असुन, त्यामध्ये ५० टक्के अनुदानावर १०० एक दिवसीय कुक्कुट पक्षी गट पुरवठा केला जातो.