महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्रात 2005 पासून लागून झाली असून आपल्या बुलढाणा जिल्हात 2007 पासून लागू करणात आली. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणे हा आहे. या योजने अंतर्गत अनेक प्रकारची कामे घेतली जातात.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सर्व ग्रामपंचायतीमध्ये वृक्षलगावड, फळबाग लागवड, बांबू लागवड, कुरण लागवड, रेशीम लागवड, फुलशेती, गुरांचे गोठे, शेळी शेड, कुक्क्ट शेड, शेतरसते, सीसी रोड, जलतारा, शोषखड्डे, सिंचन विहिरी, शेततळे, इत्यादी प्रकारची वैयक्तिक व सार्वजनिक प्रकारची कामे घेतली जातात. तसेच ही योजना ग्रामीण भागातील जॉब कार्ड धारक व अल्पभूधारक कुटूबाला लागू आहे. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील अंगमेहनतीचे काम 100 दिवसासाठी रोजगारची हमी देते. तसेच अंगमेहनतीची काम करून आपल्या गावातच एक चांगली मत्ता निर्माण करण्यास मदत होते. तसेच आपल्या शेगाव तालुक्यातील अकुशल मजुरीचे अदाईचे प्रमाण हे 100% आहे. तसेच या योजने अंतर्गत मजुराची मजुरी ही शासनामार्फत त्यांच्या वैयक्तिक आधार संलग्न बँक खात्यात वर्ग केली जाते. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची सविस्तर माहिती WWW NAREGA. NIC. IN या संकेत स्थळावर उपलब्ध आहे