पंचायत समिती वेबसाइट धोरणे
संकेतस्थळाचा उद्देश हे संकेतस्थळ पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक नागरिकांपर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचविण्यासाठी आणि पंचायत समितीच्या विकासाशी संबंधित घडामोडी नागरिकांना सहज उपलब्ध करून देण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. या संकेतस्थळाचा मुख्य उद्देश म्हणजे पंचायत समितीच्या महत्त्वाच्या सभा, कार्यक्रम, सूचना आणि प्रशासकीय माहिती नागरिकांपर्यंत वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचवणे.
हे संकेतस्थळ एक व्यासपीठ (Forum) म्हणून तयार करण्यात आले असून, नागरिक या माध्यमातून आपल्या पंचायत समितीच्या विकासासंबंधी माहिती घेऊ शकतात तसेच पंचायत समितीच्या हितासाठी आवश्यक संवाद साधू शकतात. येथे प्रत्येक नागरिकाला आपल्या पंचायत समितीच्या निर्णय प्रक्रियेत सहभाग घेण्याची संधी मिळावी हा हेतू आहे.
वेबसाईटचा उपयोग:
- महत्त्वाच्या सभा: पंचायत समितीच्या महत्त्वाच्या सभांची माहिती, वेळ, ठिकाण आणि अजेंडा नागरिकांना वेळेवर कळवणे.
- कार्यक्रम: पंचायत समिती स्तरावरील महत्त्वाचे कार्यक्रम, जसे की आरोग्य शिबिरे, सरकारी योजनांची माहिती शिबिरे, प्रशिक्षण कार्यक्रम इत्यादी नागरिकांना कळवणे.
- सूचना: पंचायत समिती कार्यक्षेत्रातील महत्त्वाच्या सूचना, जसे की पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, रस्ते विकास, आपत्कालीन सूचना इत्यादी नागरिकांना देणे.
- पंचायत समिती योजना: नागरिकांसाठी असलेल्या पंचायत समिती व शासनाच्या विविध योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे याबद्दल माहिती देणे.
- संपर्क माहिती: पंचायत समिती सदस्य, सभापती, उपसभापती, गट विकास अधिकारी, कर्मचारी आणि महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची संपर्क माहिती नागरिकांना उपलब्ध करून देणे.
- पंचायत समिती क्षेत्रातील घडामोडी: पंचायत समिती कार्यक्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती, जसे की विकासकामे, शासकीय उपक्रम, कार्यक्रम इत्यादी नागरिकांना देणे.
- तक्रार निवारण: नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या नोंदवण्यासाठी आणि त्यांचे निवारण करण्यासाठी एक माध्यम उपलब्ध करून देणे.
कायदेशीर जबाबदारीचे स्पष्टीकरण हे संकेतस्थळ पंचायत समिती प्रशासन विभागासाठी विकसित करण्यात आले असून, एका बाह्य स्वतंत्र वेब डेव्हलपर कडून हे संकेतस्थळ तयार करून घेण्यात आले आहे. संकेतस्थळ विकसित करताना त्यांनी GIGW (Guidelines for Indian Government Websites) आणि NIC (National Informatics Centre) च्या मार्गदर्शक तत्त्वांचा शक्य होईल तेवढा अभ्यास केला आहे आणि शक्य तितक्या प्रमाणात त्या तत्त्वांचे पालन करण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि, संकेतस्थळ .gov.in डोमेनवर नसून पंचायत समितीने .in डोमेन निवडले आहे व त्या डोमेनवर कार्यरत आहे आणि स्वतंत्र सर्व्हरवर होस्ट केले आहे.
हे संकेतस्थळ पंचायत समितीच्या मागणीनुसार विकसित करण्यात आले असून, या संकेतस्थळावरील सर्व माहिती पंचायत समिती प्रशासनाच्या निर्देशांनुसार अपडेट केली जाते. त्यामुळे या संकेतस्थळाच्या सामग्रीसंदर्भात कोणत्याही कायदेशीर बाबींसाठी वेब डेव्हलपर जबाबदार असणार नाही.
वापरण्याच्या अटी या संकेतस्थळाची माहिती पंचायत समिती प्रशासन विभागाद्वारे प्रकाशित आणि व्यवस्थापित केली जाते. संकेतस्थळावरील माहिती अचूक आणि अद्ययावत ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो, परंतु ही माहिती केवळ सामान्य माहिती म्हणून उपलब्ध करून दिली जाते आणि कायदेशीर पुरावा म्हणून वापरता येणार नाही.
संकेतस्थळाचा वापर करताना कोणत्याही प्रकारच्या नुकसान, खर्च किंवा हानीसाठी पंचायत समिती प्रशासन विभाग जबाबदार राहणार नाही. तसेच, संकेतस्थळावर दिलेल्या इतर संकेतस्थळांच्या लिंक्स फक्त नागरिकांच्या सोयीसाठी दिल्या आहेत, आणि त्यांच्या माहितीच्या अचूकतेबाबत किंवा उपलब्धतेबाबत आम्ही हमी देत नाही.
भारतीय कायद्याच्या अधीन राहून या अटी व नियमांचे पालन केले जाईल आणि कोणताही कायदेशीर वाद स्थानिक न्यायालयाच्या (पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील) अधिकार क्षेत्रात राहील.
कॉपीराइट धोरण पंचायत समिती संकेतस्थळावरील माहिती योग्य परवानगी घेऊन विनामूल्य पुनरुत्पादित केली जाऊ शकते. माहिती जशीच्या तशी पुनरुत्पादित करणे बंधनकारक आहे आणि ती दिशाभूल करणारी किंवा अप्रतिष्ठाकारक स्वरूपात वापरली जाऊ नये.
गोपनीयता धोरण हे संकेतस्थळ कोणत्याही अभ्यागताच्या वैयक्तिक माहितीचा संग्रह करत नाही, जोपर्यंत तुम्ही ती स्वतःहून (उदा. संपर्क फॉर्म, तक्रार नोंदणी द्वारे) प्रदान करत नाही. जर तुम्ही संकेतस्थळाद्वारे वैयक्तिक माहिती दिली असेल, तर ती केवळ नमूद केलेल्या उद्देशांसाठीच वापरण्यात येईल आणि तिची गोपनीयता राखली जाईल.
तुमच्या भेटीची तांत्रिक माहिती जसे की आय. पी. अॅड्रेस, ब्राउजर प्रकार, ऑपरेटिंग सिस्टम, भेट दिलेल्या पृष्ठांची नोंद, तारीख आणि वेळ इत्यादींचा वापर केवळ वेबसाइटच्या सुरक्षिततेसाठी, विश्लेषणासाठी आणि सुधारणा करण्यासाठी केला जातो. कोणतीही वैयक्तिक किंवा तांत्रिक माहिती कोणत्याही परिस्थितीत तृतीय पक्षासोबत विक्री अथवा शेअर केली जाणार नाही, कायद्याने आवश्यक असल्याशिवाय.
हायपर लिंकिंग धोरण बाह्य संकेतस्थळांचे दुवे: पंचायत समिती संकेतस्थळावर इतर शासकीय विभाग, संस्था किंवा संबंधित उपयुक्त संकेतस्थळांचे दुवे (लिंक्स) दिले जाऊ शकतात. हे दुवे फक्त नागरिकांच्या सोयीसाठी आणि माहितीसाठी दिले जातात. त्या बाह्य संकेतस्थळांवरील सामग्रीच्या अचूकतेसाठी किंवा त्यांच्या कार्यक्षमतेसाठी पंचायत समिती जबाबदार राहणार नाही. अशा संकेतस्थळांना भेट देताना त्यांच्या स्वतःच्या गोपनीयता आणि वापर अटी लागू होतील.